पालघर – अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलिसांनी अटक केली.
गुजरात राज्यातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवरील दापचरी चेक पोस्ट येथे नाकाबंदी लावून वाहने तपासत असताना १ टॅम्पो मिळून आला. त्यात तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले.
सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण २०,६६,४८४/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकास अटक केली.