घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले…

Published:

नवी दिल्ली – मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर पोहोचली आहे. तर, मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन ११०२. ५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता १९  किलोचा व्यावसायिक सिलेंडर २११९.५० रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांना मिळणार आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page