रेल्वे स्टेशनवर चोरी करणाऱ्यास अटक…

Published:

बदलापूर – रेल्वे स्टेशनवर चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण, लोहमार्ग पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 1,39,997/- रु. किंमतीची मालमत्ता जप्त केली. अनिल श्रीधर मासवकर असे याचे नाव आहे.

फिर्यादी बदलापूर रेल्वे स्टेशन फलाट क्र. 1 वर झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळ असलेली बॅग चोरी केली. त्या बॅगेत मोबाईल फोन, रोख रक्कम, सोन्याची चैन व अंगठी असा एकूण 1,45,997/- रु. किंमतीचा ऐवज होता. सदरबाबत दिलेल्या तक्रारीवरुन कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनिल मासवकर यास डोंबिवलीतून अटक करून त्याच्याकडून 1,39,997/- रु. किंमतीची मालमत्ता जप्त केली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page