रमेश म्हात्रेंचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला…

Published:

kalyan – कल्याण डोंबिवलीचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसेच तीन दिवसांमध्ये रमेश म्हात्रे यांना शरण येण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण प्रकरणात कोर्टाने हे आदेश दिले आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेकोर्टाने हे आदेश दिले आहे टाळून लावला आहे. कोर्टाने मुंबई हाय कोर्टाने म्हात्रे यांना दिलेला जामीन रद्द करण्याचे निर्देश दिले असून, त्यांना तीन दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कोर्टाने वैद्यकीय समुदायाच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका मांडली.

हायकोर्टाने मंजूर केलेला जामीन आदेश आम्ही रद्द करत आहोत आणि आरोपींना तीन दिवसांत पुन्हा शरण येण्याचा आदेश करत आहोत’, असे खंडपीठाने सुनावणीनंतर स्पष्ट केले. सुनावणी दरम्यान कोर्टाने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. ‘वैद्यकीय समुदायाला कोणीही हात लावू शकत नाही, हा संदेश स्पष्ट असला पाहिजे, अशी टिप्पणी कोर्टाने केली.

डॉक्टर हे नागरिकांची सेवा करतात आणि त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केला जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page