आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग…

Published:

mumbai – चर्चगेट स्टेशनजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या सुमारास हि आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

माहितीनुसार, आयकर विभागाच्या कार्यालयाच्या तळ मजल्यावर हि आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच कार्यालयातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. बघता बघता धुराचे लोट परिसरात पसरले. आग लागली त्यावेळी कार्यालयात काही कर्मचारी उपस्थित होते. त्यांना तातडीने कार्यालयाबाहेर काढण्यात आले.

सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, इमारतीतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page