dombivali – कॉन्ट्रॅक्टरकडे खंडणीची मागणी करून १५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्विकारताना माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या चौकडीला गुन्हे शाखा, घटक – ०३ कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. दिपेश लोखंडे, राहुल मुकादम, विशाल जानकर आणि नरेश सुर्यवंशी अशी या चौघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले, गटाराचे बांधकामाचे कामकाज हे कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचे केले असल्याबाबत कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, डोंबीवली यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज (RTI) टाकून सदरचा माहिती अधिकार अर्ज (RTI) मागे घेण्याकरीता कॉन्ट्रॅक्टरकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी पेंढारकर कॉलेज जवळील एका बर्गर शॉपमध्ये सापळा रचून सदर चौघांना १५ लाख रूपये रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, पाच मोबाईल फोन, दोन चारचाकी गाड्या असा एकूण २१ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ५५५/२०२६ वीएनएस २०२३ चे कलम ३०८(२),३०८(३), (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, पोलीस सह आयुक्त, (गुन्हे) ठाणे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे व शेखर बागडे सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि/बळवंत भराडे, सपोनि/सर्जेराव पाटील, पोउनि/एस. एम. तावडे खंडणी विरोधी पथक, सपोउपनि/बालाजी शिंदे, पोहवा /सुधीर कदम, पोहवा/सचिन कदम, पोकॉ गुरूनाथ जरग, सतिश सोनावणे, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे यांनी केली आहे.


