नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा…

Published:

pune – नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम भीमराव प्रभाकर कांबळे याला आज (सोमवार, ता २९) पुणे विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत कांबळेला या प्रकरणात दोषी ठरविले होते. आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

1 मे 2026 रोजी आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती आणि त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. ज्यात आरोपी भीमराव कांबळे हा चिमुकलीला हाताल धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसले. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page