मान्सून केरळमध्ये दाखल…

Published:

mumbai – केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत पुढे सरकण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मान्सूनच्या आगमनामुळे केरळ, कर्नाटक आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ आणि कर्नाटकात पुढील सात दिवसांत काही ठिकाणी 7 ते 20 सेंटीमीटरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू आणि ईशान्य भारतातही जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनने अरबी समुद्रातील काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरातील विस्तृत क्षेत्र व्यापले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या चारही विभागांत विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मच्छीमारांना 9 जूनपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page