bhiwandi – नाशिक-मुंबई महामार्गावर एका वाहनातून १५०० ते १६०० किलो गोमांस जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कोनगाव पोलिसांनी हि कारवाई केली असून, याप्रकरणी एकूण ५,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासिन इकबाल शेख आणि वसीम खलील कुरेशी अशी या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक-मुंबई महामार्गावर भूमी वर्ल्डसमोर एक संशयित पिकअप अडवला त्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीच्या जनावरांचे मांस आढळून आले. हे मांस जवळजवळ १५०० ते १६०० किलो होते. सदर मांस पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हि कारवाई करत असताना अटक करण्यात आलेल्या दोघांनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवघेणा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका पोलिसावर हॉकीने हल्ला केला असून, त्यांना हाताला इजा झाली आहे.


