desh – उत्तर प्रदेश गाझीपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. यात बुलढाण्यातील नागरिकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हि बस चित्रकूट आणि वाराणसीचे दर्शन घेऊन नेपाळमधील काठमांडूच्या दिशेने रवाना झाली होती. दरम्यान, बस चालकाचे बसवरून नियंत्रण सुटल्याने नैसरे गावाजवळ समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत करत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


