dombivali – डोंबिवली पूर्वेत एका महिलेवर ३ रिक्षा चालकांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तिन्ही रिक्षा चालकांना अटक केली आहे. चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा अशी या तिघांची नावे असून ते डोंबिवलीत रिक्षा चालवतात.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये कामाला असून, तिची ओळख असलेल्या रिक्षा चालक मित्रांनी तिला पार्टीसाठी खंबाळपाडा येथील एका फ्लॅटवर नेले. पार्टी झाल्यानंतर या तिघांनी महिलेवर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित महिलेने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल करून सदर तिन्ही रिक्षा चालकांना अटक केली. आहे.
दरम्यान,घटनेचा पुढील तपास टिळक नगर पोलीस करीत आहेत.


