डोंबिवलीत अवैध गावठी दारू भट्टी उध्वस्त…

Published:

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे पोलिसांची कारवाई…

dombivali – खोणी गाव परिसरात अवैधरित्या चालणारी गावठी दारू भट्टी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे पोलिसांनी उध्वस्त करून २ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश ठोंबरे हा व्यक्ती खोणी गाव, नाल्याच्या बाजूला झाडीमध्ये बेकायदेशीर अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून १) १,५०,०००/- रू किमंतीचा गुळमिश्रीत व नवसागरमिश्रीत वॉश ८ ड्रम ध्ये १६०० लिटर २) २००/- रू किमंतचा नवसागर ३) २०,०००/- रु किमंतीचे सतेले ४) १०,०००/- रू किमंतीचे प्लॅस्टीकचे इम ५) ६०,०००/- रू किमंती गावठी हातभटटीची दारू ३०० लिटर असा एकूण २.४०,२००/- रू किमंतीचा मुददेमाल नष्ट केला.

सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मानपाडा पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर १४३७/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध २, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोनि कापडणिस, पोउपनिरी/ तावडे, सहापोउपनिरी/भोसले, सहापोउपरी / कानडे, पोहवा/ ठाकुर, पोहवा/ राठोड, पोहवा/ शिंदे, पोहवा/ पाटील, पोहवा/ गायकवाड, पोहवा / जाधव, पोहवा/गडगे, मपोहवा/ पावसकर, चापोहवा/ हिवरे, पोना/ हासे, पोना/ मधाळे, पोशि/ वायकर, पोशि/ शेजवळ, पोशि/ ढाकणे पोशि/ पाटील, मपोशि/ भोसले यांनी केली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page