navi mumbai – बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणात दोन पोलिसांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी या दोघांची नावे आहेत. फुलकर हा नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुनाथ चिंचकर यांच्या दोन मुलांवर नार्कोटीक विभागाकडून चौकशी सुरू होती. चिंचकर यांच्या दोन मुलांसह चार जण फरार असल्याने नार्कोटिक्स विभागाकडून चिंचकर यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे, चिंचकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटल्यावर त्या दिशेने तपास करत असताना सचिन भालेराव व संजय फुलकर यांचा संबंध आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येनंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या विशेष पथकाने केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारावर मिळालेल्या माहितीवरून, भालेराव याचे हात देखील या प्रकरणात बरबटले असल्याने पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, चिंचेकर यांच्या मुलाकडून परदेशातून आणलेल्या पदार्थाची कन्साईन पोहोचवण्याचे नियोजन हे पोलीस करत होते. याबद्दल त्यांना दरमहा पंधरा लाख रुपये मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.