डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे. सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ शिल्पाचे लोकार्पण डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथे होणार असल्याने दिनांक १६/०३/२०२५ रोजी रात्री १०:०० वा. ते दिनांक १७/०३/२०२५ रोजी रात्री २३:०० वाजे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे सांडभोर यांनी सांगितले आहे.
वाहतुकीत खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.…
प्रवेश बंद- डोंबिवली शहरातून घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना शिवम हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदर वाहने जिमखाना रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद- सुयोग रिजन्सी मार्गे घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदर वाहने कावेरी चौक, एम. आय. डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद- खंबाळपाडा रोड, ९० फीट रोड, ठाकुर्ली रोड मार्गे घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदर वाहने सावित्रीबाई फुले नाट्यगृह मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – आजदे गाव, आजदे पाडा येथून घरडा सर्कल कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदर वाहने एम. आय. डी. सी. अंतर्गत रस्त्यांनी इच्छित स्थळी जातील.
तरी नागरिकांनी, वाहन चालकांनी नमूद कालावधीत घरडा सर्कल कडील प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा जास्तीत जास्त वापर करावा. असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.