रायगड – यशश्री शिंदेंच्या हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. दाऊद शेखला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून अटक करण्यात आली आहे.
उरणमध्ये दाऊदने यशश्री शिंदेची हत्या केली होती. त्यानंतर तो फरार होता. अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला कर्नाटक राज्यातून अटक केली.