देशभरात आज (१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून, १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी एकूण ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रातही आजपासून मतदानास सुरूवात झाली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होईल.
पहिल्या टप्प्यात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, आसाम, बिहार, उत्तराखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, लक्षद्वीप, पाँडेचेरी, सिक्किम, नगालँडमध्ये मतदान होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही आज मतदान होत आहे. नागपूर, रामटेकसह विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.