कल्याण – मित्राकडूनच मित्राला गोळीबार करण्यात आल्याची घटना खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने परिसरात घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुशील महंतो असे या जखमी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुशील हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत होता, अचानक त्यातील एका मित्राने त्याच्यावर गोळी झाडली. त्यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली, आणि जीभ फाडून हि गोळी त्याच्या घशामध्ये अडकली.

दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करत आहते.