जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली गावात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते.
या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. दरम्यान, पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि गावकरी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला.