कल्याण – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कल्याणमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १) सुरज राजगुरू २) राहुल मांजरे ३) साजन अहिरे ४) देवकिसन कुमारिया अशी या चौघांची नावे आहेत.
वल्लीपिर चौकात ४ इसम गावठी कट्टा घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ डिटेक्शन टीमचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून या चौघांना अटक केली. त्यांच्याकडे १ गावठी बनावटीचा देशी कट्टा मिळून आला. सदर प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशन नंबर २२३/२०२३ भारतीय हत्यार कायदा ३,(१) २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदरची यशस्वी कामगिरी कल्याण झोन ३ डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक (क्राईम) कार्लेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रूपवते, पोलीस हवालदार सचिन साळवी, पावशे, बाविस्कर, कातकडे, बागुल यांनी केली.