पुणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयात तर्फे सन २०२१ रोजी उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून शिराळा पोलीस ठाण्याचा देशात ७ वा तर राज्यात पहिला क्रमांक आल्याबद्दल गृहमंत्रालय भारत सरकारच्या नवी दिल्ली यांच्या मार्फत पुणे येथे आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुन्हे, कायदा व सुव्यवस्था परिषदेमध्ये हा गौरव करण्यात आला.
त्यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ, विशेष पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर परीक्षेत्र सुनील फुलारी, पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांची प्रमुख उपस्थिती तसेच शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक हंडे, विनोद जाधव, महेश साळुंखे हे देखील उपस्थित होते.