पालघर – पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २७ व २८ जुलै रोजी पालघर जिल्हयाला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचा विचार करता, वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
वसई, पालघर, डहाणू व तलासरी या तालुक्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे.