गुन्हे शाखा घटक, २ भिवंडी पोलिसांनी ७ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

Published:

ठाणे – गुन्हे शाखा घटक,२ भिवंडी पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणून ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

घोडेखात आळी, कल्याण येथील श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिरात चांदीच्या दागिन्यांची आणि इतर वस्तूंची चोरी झाली होती. सदर बाबत बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून साकीब उर्फ सलमान मोहंमद अख्तर अंसारी यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयात चोरलेली सव्वा किलो वजनाची चांदीची गदा तसेच चांदीचा मुकुट, चांदीचा रुईचे पानांचा हार, पितळी टोला, टाळ, दान पेटीतील ६,४७०/- रु. रक्कम, एलईडी टी.व्ही. असा 100% मुद्देमाल हस्तगत करून मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

त्यानंतर जानेवारी २०२३ पासून चोरीस गेलेल्या व हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती संकलित करण्यासाठी गुन्हे शाखा घटक २ भिवंडी मध्ये विशेष पथक नेमण्यात आलेले होते. त्याप्रमाणे सदर विशेष पथकातील पोलिसांनी चोरीस गेलेल्या व हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती संकलित करून, CEIR mobile app या प्रणालीचा वापर करून अॅपल, सॅमसंग, व्हीवो, ओप्पो, वन प्लस अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ४२ मोबाईल फोन (एकूण ५,७९,०००/- रूपये किंमतीचे) हस्तगत करण्यात यश मिळविले.

तसेच सोन्याचे नकली दागिने दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका इसमास पोलिसांनी अटक केली. अजय राजुभाई वाघेला असे याचे नाव आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page