कल्याण – पश्चिमेतील घोडेखोत आळी येथील प्रसिद्ध दक्षिण मुखी मारुती मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी चांदीची गदा, मुकुट, छत्र, हार तसेच इतर पितळी वस्तू , दानपेटीतील रक्कम आणि १ सीसीटीव्ही, राउटर व डिव्हिआर चोरून नेले.
पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चोरांनी मंदिराच्या बाहेरील जाळीतून प्रवेश करून आतील मंदिर गाभा-याचे लाकडी दरवाजाची कडी तोडून मंदिर गाभा-यात प्रवेश करून चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंची चोरी केली.
सदर प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. २८८ / २०२३ भा.द.वि.स. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.