कल्याण – गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी करणाऱ्या एकास बाजारपेठ पोलिसांनी अटक करून एकूण ८ जनावरांची सुटका केली. साबीर मेहमूद हसन चौधरी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गोविंदवाडी ब्रिजच्या खाली, डॉन कॅन्टीन जवळ, कल्याण या ठिकाणी काही इसम एका गाडी मधून गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी त्यांना घेऊन येणार असल्याची माहिती डिटेक्शन ब्राचं मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून साबीर मेहमूद हसन चौधरी यास अटक करून एकूण १०,७०,०००/- रुपये किंमतीची ८ गोवंशीय जातीची जनावरे त्यात ४ गाय आणि ४ बैल आणि टेम्पो असा मुद्देमाल हस्तगत केला.
दरम्यान, सदर गाय आणि बैलांना चौधर पाडा, बापगाव ता.भिवंडी येथील गौशाळा येथे ठेवण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास API नवनाथ रुपवते करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली API नवनाथ रूपवते, पोलीस हवालदार सचिन साळवी, पोलीस हवालदार पावशे, पोलीस हवालदार परमेश्वर बाविस्कर, पोलीस नाईक चिंतामण कातकडे, पोलीस शिपाई रामदास फड, पोलीस शिपाई आंधळे यांनी केली.