नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या १२ आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.
याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना नवी याचिका करायला न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तूर्तास नियुक्ती वरची स्थगिती हटली आहे. पण सुनील मोदी जोपर्यंत नवीन याचिका न्यायालयात दाखल करत नाहीत तोपर्यंत या आमदारांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा आहे. या आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी नवी याचिका दाखल झाल्यास १२ आमदारांच्या नियुक्तीला पुन्हा स्थगिती मिळू शकते.