सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल…

Published:

मुंबई – जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले असून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी, तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पटेल म्हणाले, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सरकारमध्ये सामील झालो. आज काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. काल काही नियुक्ती केली आहे. मागच्या अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. सप्टेंबरमध्ये दिल्लीत अधिवेशनमध्ये कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष होतो. पक्षातील सर्व नियुक्त्या माझ्या सहीने झाल्या होत्या. संघटना निवडणूक न करता जयंत पाटील यांना तात्पुरती प्रदेशाअध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता जयंत पाटील यांना या जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या जागी सुनील तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष करतो, आतापासून सर्व कामे ते पाहतील. याबाबत जयंत पाटील यांना असे सूचित केले आहे.

तर तटकरे यांनी अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष नेमल्याचे जाहीर केले. 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page