ठाणे – शहापूर तालुक्यातील गोठेघर गावात ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी तर २० हजारांची लाच घेताना महिला सरपंचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी रंगेहात पकडले. ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव दिलीप गोविंद इंगळे आणि रुचिता भालचंद्र पिंपळे असे महिला सरपंचाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी गोठेघर, ग्रामपंचायत हद्दीतील राईस मिल ते चिंतामणी प्लाझा दरम्यान पिण्याचे पाण्याचे पाईप लाईनचे केलेल्या कामाचे बिल १,२३,१७५/- रु. मजूंर केल्याचा मोबदला म्हणून पिंपळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २३,०००/- रु आणि इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५०००/-रु. लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती गोठेघर, ग्रामपंचायत कार्यालयात इंगळे तक्रारदार यांच्याकडे ५००/- रु. आणि पिंपळे २०,०००/- रु. लाच स्वीकारताना एसीबीने या दोघांना रंगेहात पकडले.