डोंबिवली – किरकोळ वादातून खून करणाऱ्या एका इसमास मानपाडा पोलिसांनी अटक केली. किरण प्रभाकर शिंदे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून शैलेश अविनाश शिलवंत असे मयताचे नाव आहे.
मोनार्च क्रिस्टल, टाटा पावर हाऊस, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी शैलेश शिलवंत आणि किरण शिंदे यांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्या वादातून किरण शिंदे याने चाकूने शैलेश याच्यावर वार करुन त्याचा खून केला आणि तो तेथून पळून गेला. असल्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या आम्हितीच्या आधारे किरण शिंदे यास औरंगाबाद येथे पळून जाण्याचा प्रयत्नात असताना अटक केली. किरण शिंदे हा मानपाडा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दुखापती करण्याचे २ गुन्हे आणि विनयभंगाचा १ गुन्हा दाखल आहे.
सदरची यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिरी. सुरेश मदने, सपोनि अविनाश वनवे सपोनिरी. सुनिल तारमळे, सपोनिरी. दत्तात्रय सानप सपोनिरी. ज्ञानोबा सुर्यवंशी, पोउनिरी. प्रदीप गायकवाड, पोहवा राजकुमार खिलारे, पोहवा सुनिल पवार, पोहवा दिपक गडगे, पोना शांताराम कसबे, पोना यलप्पा पाटील, पोशि अशोक आहेर, पोशि विजय आव्हाड, पोशि महेंद्र मंजा, पोशि मिनीनाथ बढे यांनी केली.