कल्याण – कल्याण डोंबिवली शहरामधील सुमारे ५,००,०००/- रु. किंमतीचे एकूण ४० मोबाईल गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी शोधून ते मोबाईल धारकांना परत केले.
कल्याण परिमंडळ ३ मधील पोलीस स्टेशनला सन २०२३ मध्ये दाखल असलेल्या प्रॉपर्टी मिसींग मधील मोबाईल गहाळ झाल्याचे प्रमाण जास्त असल्याने पोलीस शोध घेत असताना CEIR प्रणालीचा वापर करून तसेच मोबाईल फोनचे IMEI नंबर वरून गहाळ मोबाईलचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये ५,००,०००/- रु. किंमतीचे एकूण ४० मोबाईल पोलिसांनी शोधले आणि ते मोबाईल धारकांना परत केले.
सदरची यशस्वी कामगोरी वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, संजय माळी, पो.हवा विलास कडु, बालाजी शिंदे, बापूराव जाधव यांनी केली.