मुंबई – साकीनाका परिसरात महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या महिलेची रिक्षातच हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करणाऱ्या इसमास साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. दिपक बोरसे असे याचे नाव आहे. तर सदर महिला विवाहित होती. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साकीनाक्यातील खैराणी रोड परिसरातून दिपक बोरसे आणि हि महिला रिक्षेतून जात होते. त्यावेळी काही कारणावरुन या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिपक बोरसेने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला आणि स्वतःलाही जखमी करुन घेतले आणि तेथून पळ काढला.
याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दिपक बोरसेला अटक केली. दरम्यान, मृत महिलेचे लग्न झालेले आहे. तिला एक मुलगाही आहे. तिचे नवऱ्याशी पटत नसल्याने ती तिच्या माहेरी राहात होती.