डोंबिवली – सोनसाखळी, मोबाईल जबरी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक करून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले. मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी असे याचे नाव आहे.
फिर्यादी शरद पुंडलीक कडुकर हे भोपर कमाणी जवळ पायी चालत जात असताना सदर इराणी इसमाने कडुकर यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या हातातील ११,५००/- रू किंमतीचा मोबाईल जबरीने खेचून चोरी करून नेले बाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहाड कल्याण भागात सापळा रचून सदर इराणी चोरट्यास अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हयाची कबुली दिली तसेच त्याने मानपाडा, कळवा, शिवाजीनगर, मध्यवर्ती, नारपोली, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हददीत साथीदाराच्या मदतीने चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.
त्याच्याकडून पोलिसांनी ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८ मोटार सायकली, ५ मोबाईल फोन असा एकूण ४,२५,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, सदर कारवाईत १ चैन स्नॅचिंग, ४ मोबाईल स्नॅचिंग व ८ मोबाईल सायकलचे असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच सदर इराणी चोरट्याविरूद्ध महात्मा फुले, कोळसेवाडी, खडकपाडा, मानपाडा, डोबिवली अशा विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी एकूण २१ गुन्हे दाखल आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुनिल कु-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा राजकुमार खिलारे, पोहवा शिरीष पाटील, पोहवा सुनिल पवार, पोहवा संजु मासाळ, पोहवा विकास माळी, पीना यल्लापा पाटील, पोना देवा पवार, पोशि अशोक आहेर, पोशि विजय आव्हाड, पोशि महेद्र मंझा यांनी केली.