कल्याण – मारहाण करून जबरी चोरी करणा-या तिघांना गुन्हे शाखा घटक, ३ कल्याण पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १,७७,०००/- रु. किंमतीचा आणि इतर मुद्देमाल जप्त केला. नाबीर शेख, प्रेमकुमार गोस्वामी, सुरज विश्वकर्मा अशी या तिघांची नावे आहेत.
फिर्यादी भिम सिंग हे स्कुटीवरून कामावरून घरी जात असताना काका धाब्याजवळ श्री मलंग रोड, नांदिवली रोड येथे २ इसमांनी यांच्या डोक्यात जोराचा फटका मारून जखमी करून त्यांच्यकडील स्कुटर व पैसे घेऊन पळून गेलेबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच फिर्यादी अक्लेश चौधरी हे देखील कामावरून घरी जात असताना देशमुख होम्स, कमानी जवळ टाटा पावर, डोंबिवली पूर्व येथे आले असता त्यांना ३ जणांनी चाकूने वार आणि मारहान करून त्यांचा मोबाईल व पाकीट घेऊन पळून गेले बाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दोन्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे एन.आर.सी कॉलनी, मोहने गाव,आंबिवली येथे सापळा रचून सदर तिघांना अटक केली. सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून ३ मोटार सायकल आणि ५ मोबाईल फोन असा एकूण १,७७,०००/- रु. किंमतीचा आणि इतर मुददेमाल जप्त करून विविध पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणेल.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त जयजित सिंह पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनवणे (गुन्हे शोध – १) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पोहवा विश्वास माने, अनुष. कामत, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, प्रविण बागुल, रमाकांत पाटील, श्रीधर हुंडेकरी, किशोर पाटील, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, चालक पोहवा बोरकर यांनी केली.