मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ऑईल टँकरला भीषण आग लागली आहे. लोणावळा ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. या आगीत ४ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, महामार्गाची केवळ एक बाजू वापरात असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.