डहाणू – जव्हार रस्त्यावरील रानशेत (गेटीपाडा )येथे दि.६ मे रोजी संध्याकाळी च्या सुमारास एक रिक्षा, बाईक व स्कुटर असा तीन वाहनांचा आपघात झाला. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील एका बाईक वर पालघर जिल्ह्यातील दोन विख्यात आदिवासी वारलीचित्र कलाकार यांचा अपघात झाला. यामध्ये कल्पेश गोवारी रा. खुताड (शिगाव – बोईसर ) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर राजेश मोर रा. गंजाड हे जखमी झाले आहेत. हे दोन्ही कलाकार आदिवासी वारली चित्रकलेमुळे जगविख्यात असे असून त्यांनी आदिवासी वारली चित्रशैली जगाच्या कानकोपऱ्यात पोहचवली होती.
त्यातील कल्पेश गोवारी हा एक हरहुन्नरीअशा कार्यशील, क्रिएटिव्ह, मनमिळावू, नवीन कौशल्य आत्मसात करून विविध कामे अधिक प्रभावी करण्यासाठी उत्साही. कुशल नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव असलेला, आणि सतत समाज जागृतीच्या,आदिवासी सशक्तीकरणाच्या कामासाठी धडपडणारा हि ओळख जपत सगळ्यांशी आपुलकीने वागणारा खूप मेहनती असं व्यक्तीमत्व होत. त्यांनी नुकतेच एक आदर्श उदाहरण आपल्या समोर उभे केले होते “जोहार आर्ट अँड क्राफ्ट सेंटर” शिगाव खुताड येथे उघडले होते.त्यामध्ये आदिवासी वारली चित्रकलेची वेगवेगळी पेंटींग, फोटोज, आदिवासी महापुरुषांचे फ्रेम, आदी होते. त्यातून आदिवासी समाजाच्या संस्कृतीची ओळख होत होती.
कल्पेश गोवारी हा सामाजिक चळवळीतला एक होतकरू तरुण होता. आदिवासी संस्कृती व अस्मिता त्याच्या रक्तात होती.बऱ्याच वर्षांपासून आयुश च्या विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होते, तसेच विविध प्लॅटफॉर्म वर चर्चा,संवाद,बैठक,स्टॉल,प्रशिक्षण,प्रदर्शन दरम्यान आयुश चे प्रतिनिधीत्व केले होते. कल्पेश यांच्या अश्या अचानक जाण्याने आदिवासी समाजाचा एक होतकरू व चांगला कलाकार हरपला आहे. त्याला आदिवासी समाजाकडून ‘अंतिम जोहार’ ची आदिवासी समाजाकडून जड अंतःकरणाने निरोप दिला आहे.