प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघे अटकेत…

Published:

कल्याण –  डॉक्टर प्रवाशाला दारू पाजून त्याची सोन्याची चैन, मोबाईल, पैसे लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून एकूण १,५३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. कैसर मलंग शहा, नमीर नईम शेख, शाबीर इमाम शेख ऊर्फ धुरी आणि सलीम अकबर शेख अशी चौघांची नावे आहेत.

वल्लीपिर चौक, कल्याण येथे एका प्रवाशी डॉक्टरला (फिर्यादी) एका रिक्षावाल्याने त्याच्या मित्रांसोबत दारू पाजून, गोड बोलून, विश्वास संपादन करून डॉक्टरच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि मोबाईल मधील गुगल पे चा पासवर्ड घेऊन त्यातील एकाने डॉक्टरच्या मोबाईल वरून एकूण ७३,०००/- रुपये ट्रान्सफर करून मोबाईल काढून घेतला आणि डॉक्टरला डोंबिवलीत अंधारात सोडून दिले असल्याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून कैसर मलंग शहा यास संभाजीनगर येथून अटक केली. तसेच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नमीर नईम शेख, शाबीर इमाम शेख ऊर्फ धुरी आणि सलीम अकबर शेख या तिघांना कल्याण येथून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व १ ऑटो रिक्षा असा एकूण १,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगिरी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वपोनिरी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोरे, पोलीस हवालदार पावशे, पोलीस नाईक कातकडे, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल, पोलीस नाईक फड, आंधळे यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनिरी मुंडे करीत आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page