ठाणे – देशी बनावटीचे १७ पिस्टल, ३१ मॅग्झीन व १२ जिवंत काडतुसे असा अवैध शस्त्रसाठा मालमत्ता गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली. रमेश मिसरिया किराडे (बिलाला) आणि मुन्ना अमाशा अलवे (बरेला) अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीवरून राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून २ इसमांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ३ देशी बनावटीचे पिस्टल, ६ मॅग्झीन व ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली. त्यासंदर्भात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर दोघांकडे अधिक तपास करून पोलिसांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवरील पाचोरी टुनकी भागातुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आणखी १४ अवैध देशी बनावटीचे पिस्टल, २५ मॅग्झीन व ८ जिवंत काडतुसे हस्तगत केली.
मालमत्ता गुन्हे शाखेने अशा प्रकारे एकूण १७ देशी बनावटीचे पिस्टल, ३१ मॅग्झीन व १२ जिवंत काडतुसे हस्तगत केले. आणि दोघांना अटक केली.
सदर यशस्वी कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुत शोध-२ गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सपोनि महेश जाधव, पोलीस उप निरीक्षक स्वप्निल प्रधान, पोलीस अंमलदार प्रशांत भुर्के, राजाराम शेगर, किशोर भामरे, अर्जुन काळे, संदीप भालेराव, राजेंद्र घोलप, रूपवंतराव शिंदे, नगराज रोकडे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे (बालक) व महिला पोलीस अमलदार आशा गोळे, गिताली पाटील यांनी केली.