डोंबिवली – बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे.
डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी संयुक्तपणे टिळक चौक,डोंबिवली पूर्व व दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट परिसर डोंबिवली पश्चिम येथे विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे, यासह इतर वाहतूक नियम मोडणारे रिक्षाचालक तसेच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चार चाकी अशा एकूण ६२ कसूरदार वाहनांवर धडक कारवाई केली असून १,४५,४५०/-रुपये दंड आकारण्यात आला.
दरम्यान, बेशिस्त वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यासह ही संयुक्त कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी म्हंटले आहे.