५० हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात…

Published:

ठाणे – भिवंडी तहसीलदार कार्यालयातील महिला नायब तहसीलदाराला ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सिंधू उमेश खाडे असे नायब तहसीलदाराचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या अशीलाचे फेरफार हरकत प्रकरणाचा अंतिम निर्णयाची प्रत देण्यासाठी सिंधू उमेश खाडे यांनी १,५०,०००/- रू लाचेची मागणी करून सदर रक्कमेपैकी ५०,०००/- रुपये लाच घेतली असता खाडे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page