डोंबिवली – भाजपचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशी यांच्यावर शारीरीक सुखासाठी धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेचे पती पोलीस अधिकारी आहेत. दोघांमध्ये वाद सुरू आहेत. तसेच पोलीस अधिकारी हे जोशी यांचे मित्र आहेत. दरम्यान घर खाली कर, माझे सोबत शारीरीक संबंध ठेव अशा धमक्या देऊन शारीरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप सदर महिलेने जोशी यांच्यावर केला आहे.
सदर महिलेने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.