डोंबिवली – पूर्वेतील पिझ्झा हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या एका इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक केली. विजय मन्तोडे असे त्याचे नाव आहे. पूर्वेतील चिपळुणकर रोडवरील डॉमिनोझ पिझ्झा हॉटेलमधील रोख रक्कम एकूण ८०,२७५/- रु रोख रक्कम चोरी झाली असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुरनं. १८९/२०२३ भा.दं.वि ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून विजय मन्तोडे यास अटक केली. तसेच त्याच्याकडून एकूण ८०,२७५/- रू.पैकी ४७,८००/- रूपये हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी सहा. पोलीस आयुक्त सुनिल कुराडे डोंबिवली विभाग, वपोनि सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, पोहवा सचिन भालेराव, पोहना विशाल वाप, पोना हनुमंत कोळेकर, पोअ शिवाजी राठोड, पोअ भूषण चौधरी यांनी केली.