डोंबिवली – प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सागर पारेख आणि संपतराज जैन अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक राकेश म्हामुणकर हे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षा घेऊन रांगेत असताना २ जण तिथे आले. आणि त्यांनी बिर्ला मंदिर येथे जायचे असल्याचे राकेश यांना सांगितले. राकेश यांनी दोघांना रिक्षात बसवले. त्यानंतर बिर्ला मंदिर येथे दर्शन घेऊन हे दोघे पुन्हा रिक्षात बसले. आणि त्यांनी राकेश यांना गुंगीचे औषध टाकलेला पेढा प्रसाद असल्याचे सांगत खाण्यास दिला. पेढा खाल्ल्यानंतर राकेश बेशुद्ध झाले. यानंतर हे दोघे राकेश यांची सोन्याची चैन आणि मोबाईल घेऊन पळून गेले.
सदर प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यानुषंगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांना अटक केली.