अंमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे अटकेत…

Published:

बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी…

कल्याण – अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. करीम उर्फ बाबू शब्बीर शेख आणि सीमाब कईम शेख उर्फ गुड्डू चपाती अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिराग हॉटेलच्या जवळ, रेतीबंदरकडे जाणाऱ्या पूला खाली दोघेजण गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची बातमी डिटेक्शन स्टाफ मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ६ किलो गांजा, १ मोटार गाडी, २ मोबाईल असा एकूण १,८०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सदरची यशस्वी कामगिरी व.पो.नि नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी अरुण घोलप, सपोनिरी रूपवते, पो हवा सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, पो ना फड, दमयंती शेळके यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनिरी अरुण घोलप करत आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page