चाकूने वार करून मेव्हण्याचा खून…

Published:

डोंबिवली – रागाच्या भरात आपल्या मेव्हण्यावर चाकूने वार करून खून करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी केली. रमेश वेलचामी (तेवर) असे अटक करणाऱ्याचे नाव आहे तर मारीकन्नी रामास्वामी (तेवर) असे मेव्हण्याचे नाव आहे. 

सदर बाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे  रमेश वेलचामी (तेवर) यास कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली.

सदरची यशस्वी कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजित सिंग,  पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे गुन्हे शोध १ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक शशांक शेळके व त्याचे सहकारी पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहा. पो. उप निरी / संजय माळी, पोहवा / प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव पोहवा / विकास माळी (मानपाडा पोलीस ठाणे), रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापुराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, पोहवा गोरखनाथ पोटे, पोहवा / विलास कडू, पोशि/ गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, चापोशि/ राहुल ईशी सर्व नेम गुन्हे शाखा, घटक कल्याण यांनी केली.    

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page