एमडी पावडरसह तिघे अटकेत…

Published:

ठाणे – २४० ग्रॅम वजनाच्या एम.डी.पावडर (मेफेड्रोन) या अंमली पदार्थासह तिघांना गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे पोलिसांनी अटक केली. अमर अशोक तुसामकर, मोहसिन शफिक शेख आणि निहाजुल सत्तार सय्यद अशी या तिघांची नावे आहेत.

रोड न. २२ सर्कल जवळ किसननगर कडे जाणाऱ्या रोडवर, वागळे इस्टेट येथे २ इसम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर तिघांना अटक केली.

त्यांच्याकडून एकूण ९,६०,०००/- रुपये किंमतीचे २४० ग्रॅम वजनाचे एम.डी. पावडर (मेफेड्रोन) तसेच रोख रक्कम, मोबाईल, २ मोटार सायकल असा एकूण १४,०७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याविरुध्द श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page