विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडकन खाली आली होती. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, अशी मिश्कील टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या अपघाताची माहिती दिली. बारामती येथील उद्घाटन प्रसंगावेळी शनिवारी ही घटना घडली.अजित पवार यांनी आपल्यासोबत घडलेल्या अपघाताची माहिती देत आपण सुखरूप असून जास्त ईजा झालेले नसल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले, मला 11 पर्यंत मुंबईत पोहोचायचे होते. कारण गेल्या काही दिवसात कसे अपघात होतात, तुम्ही बघताय. विचारता काही सोय नाही. काल दिवसभर हे मी कुणाला सांगितले नाही. परंतु, तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.