नवी मुंबई – वरिष्ठांसाठी ५ लाख रुपये लाच घेताना नवी मुंबई महानगरपालिकेतील उप आयुक्त परिमंडळ २ कार्यालयातील लिपीकाला अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबई यांनी रंगेहात पकडले. दिनेश राजेंद्र सोनावणे असे या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हे नवी मुंबई महानगरपालिका येथे कार्यरत असून त्यांची नेरूळ येथून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेली अंतर्गत बदली पूर्ववत करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे वार्षिक गोपनीय शेरे लवकरात लवकर पाठवण्याकरिता दिनेश सोनावणे यांनी त्यांच्या वरिष्ठांसाठी तक्रारदार यांच्याकडून ५ लाख रु. लाचेची मागणी करून ती घेताना सोनावणे यांना रंगेहात पकडले.