डोंबिवली – रिक्षा आणि मोटार सायकल चोरी करणा-या दोघांना डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडून एकूण ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. श्रीकांत शेडगे आणि विक्रम साळुंखे अशी दोघांची नावे आहेत.
फिर्यादी यांची ऑटो रिक्षा बंदिस्त हॉटेल शेजारी, चोळेगाव तलावाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला, पूर्व येथे पार्क करून ठेवली असता ती चोरी केली असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीकांत शेडगे आणि विक्रम साळुंखे या दोघांना पिसवली, कल्याण येथून सदर गुन्हयातील रिक्षाचे पार्ट विक्री करत असताना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १ मोटार सायकल देखील जप्त करून २ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल बाघ, पोहवा प्रशांत सरनाईक, पो.अ. नितीन सांगळे, पो.शि. पाटील, पो.शि.शिर्के यांनी केली.