केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे रस्ते अपघातात थोडक्यात बचावले. बक्सरहून पाटण्याला परतत असताना कोरानसराय पोलिस स्टेशनची गाडी त्यांच्या ताफ्यातून कालव्यात पडली. त्यामागेच केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे वाहन होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. रविवारी रात्री नऊ वाजता डुमराव येथील मथिला-नारायणपूर रोड पुलाजवळ हा अपघात झाला.जखमी पोलिसांना डुमराव सदर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेत चार पोलीस कर्मचारी आणि एक चालक जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.अपघाताबाबत अश्विनी चौबे यांनी सांगितले की, त्यांनी जखमी पोलिसांना डुमराव सदर रुग्णालयात आणले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर दोन पोलीस जास्त जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर मी त्यांच्यासोबत एम्स पाटणाला रवाना होत आहे. सर्व पोलीस कर्मचारी आणि चालकाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.