डोंबिवली – मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अटक केली. फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान आणि सागर श्याम पारखे अशी या दोघांची नावे आहेत.
नव डोंबिवली सोसायटी, डी विंग, गाळा न.३०, उर्सेकरवाडी, मधुवन गल्ली, डोंबिवली पूर्व येथील श्री प्रिया मोबाईलच्या दुकानातील २ इसमांनी एकूण ४,०७,१२०/- रु किंमतीचे मोबाईल घरफोडी चोरी करून नेले असल्याबाबत फिर्यादी सुंदरम गवंडर यांनी तक्रार दिल्याने डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान आणि सागर श्याम पारखे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण २,३७,६० /- रू किंमतीचे मोबाईल हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण सचिन गुंजाळ, सपोआ/डोंबिवली विभाग, सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शन व देखरेखी खाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हासगुळे, पोउनि विजय कांबळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, पोहवा विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, पोशि राहुल ठाकुर यांनी केली.