डोंबिवली – डोंबिवलीत एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्व शांती नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला.
याबाबत वृत्त असे आहे कि, ३ वर्षापूर्वी या तरुणीचे लग्न झाले होते. ती डोंबिवलीत माहेरी आली होती. शांती नगर जैन मंदिर शेजारील रस्त्याने ती जात असताना तिच्याच ओळखीचा एक तरुण तिला रस्त्यात भेटला आणि त्याने तिला तू माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला त्यावेळेस त्या मुलीने त्यास लग्नासाठी नकार दिला व विरोध केला असता या गोष्टीचा राग मनात घरून त्याने तिच्यावर चाकूने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.